ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
मंदिरात पाया पडल्यानंतर आपण प्रदक्षिणा घालतो मात्र ही प्रदक्षिणा का घालतात हे जाणून घ्या
मंदिरात प्रदक्षिणा घालणे शक्य नसले होत तर स्वत;भोवती प्रदक्षिणा घातली तरी चालते म्हणून आरती झाल्यावरती घालीन लोटांगण... म्हणत स्वत;भोवती प्रदक्षिणा घालतो.
देवमूर्तीची प्रदक्षिणा नेहमी उजव्या बाजूपासून सुरू केली पाहिजे,
ज्या ठिकाणी मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झाली आहे त्याच्या मध्य-बिंदूपासून काही अंतरावर दैवी प्रभाव असतो.
जो जवळ असताना अधिक गहिरा व दूर गेल्यावर कमी होतो, म्हणूनच मूर्तीला प्रदक्षिणा घातल्याने दिव्य सामर्थ्याच्या ज्योतीमंडलातून आपण जातो
दिव्य सामर्थ्याच्या ज्योतीमंडलातून निघणार्या तेजाची प्राप्ती येते आणि या तेजाच्या प्रभावामुळे तुम्हाला एक विशेष प्रकारची दैवी शक्ती प्राप्त होते.