Surabhi Jayashree Jagdish
बरेच लोक स्वयंपाकात सैंधव मीठाचा वापर करतात. या दोन्ही मीठाचे काय फायदे आहेत हे तुम्हाला माहिती आहे का? शिवाय यामध्ये फरक काय आहे ते तुम्हाला कल्पना आहे का?
पांढरे मीठ घरांमध्ये सामान्य आहे आणि ते स्वस्त आहे. मात्र, त्यात आयोडीनचं प्रमाण असल्याने त्याच्या सेवनाचा सल्ला देण्यात येतो.
आयोडीन हे अत्यंत महत्त्वाचे खनिज आहे. थायरॉईड कार्य आणि मेंदूच्या विकासासाठी आयोडीन विशेषतः महत्वाचे आहे.
पांढऱ्या मीठावर प्रक्रिया केली जाते, त्यामुळे फायद्यापेक्षा तोटेच जास्त असल्याचं अनेक आरोग्य तज्ज्ञांचं म्हणणं आहे.
सैंधव मीठामध्ये मॅग्नेशियम, पोटॅशियम आणि कॅल्शियम सारखी खनिजं असतात. या मिठामध्ये खनिजे अत्यंत कमी प्रमाणात असतात.
पांढऱ्या मिठाऐवजी त्याचा वापर केल्यास रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत होते.
पांढऱ्या आणि सैंधव मीठाचा आरोग्याच्या दाव्यांबाबत आरोग्य तज्ज्ञांचेही एकमत नाही. त्यामुळे मीठ बदलण्याचा विचार करत असाल तर तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घ्या