Ankush Dhavre
चित्ता: सडपातळ आणि लांबट शरीर, हलके वजन (२५-७२ किलो). तर जॅग्वार मजबूत आणि भरदार शरीर, वजन अधिक (५६-९६ किलो). बिबट्या चित्यापेक्षा भरदार पण जग्वारपेक्षा लहान असतो, वजन (३०-७० किलो).
चित्ता: साधे ठिपके असतात, गोलसर आणि ठळक. जॅग्वार: ठिपक्यांच्या आत छोटे डाग (रोझेट्स) असतात. बिबट्या: रोझेट्स असतात, पण आत कोणताही डाग नसतो.
चित्ता: जगातील सर्वात वेगवान प्राणी (१२० किमी/तास).जॅग्वार: वेगाने धावू शकतो, पण चित्याएवढा वेगवान नाही. बिबट्या: वेगात चांगला असतो, पण झाडांवर चढण्यात अधिक कुशल आहे.
चित्ता: मुख्यतः आफ्रिकेच्या गवताळ प्रदेशात आढळतो. जॅग्वार: दक्षिण अमेरिका आणि अॅमेझॉन जंगलात आढळतो. बिबट्या: आफ्रिका आणि आशियाच्या जंगलात आढळतो.
चित्ता: शिकारीवर वेगाने झडप घालतो आणि गळा दाबून ठार मारतो. जॅग्वार: जबड्याने कवटी फोडतो, पाण्यातूनही शिकार करतो. बिबट्या: झाडांवर शिकार लपवतो आणि दबा धरून हल्ला करतो.
चित्ता: लहान जबडा आणि कमकुवत चावा.जॅग्वार: सर्वात ताकदवान जबडा असलेला मांजरप्राणी. बिबट्या: मजबूत जबडा पण जॅग्वारपेक्षा कमी शक्तिशाली.
चित्ता: मनुष्याला फारसा धोकादायक नाही, एकटा राहतो. जॅग्वार: अत्यंत आक्रमक आणि मजबूत, एकटा राहतो. बिबट्या: हुशार आणि चपळ, झाडांवर वेळ घालवतो.
चित्ता: पोहण्यात कुशल नाही. जॅग्वार: उत्तम पोहणारा, पाण्यात शिकार करतो. बिबट्या: पोहू शकतो, पण तो जग्वारसारखा पाण्यात वेळ घालत नाही.