Tanvi Pol
भारतात आलिशान हॉटेल्सची चर्चा होताच ताज हॉटेलचे नाव सर्वप्रथम घेतले जाते.
समुद्रकिनारी उभे असलेले ताज हॉटेल नेहमीच मुंबईच्या वैभवाचे प्रतीक आहे.
ताज हॉटेल हे गेटवे ऑफ इंडिया बांधण्याच्या आधी उभारण्यात आले होते.
मुंबईकर असलेल्या प्रत्येक व्यक्तीला एकदा तरी ताज हॉटेलमध्ये राहण्याची इच्छा असते.
मात्र तुम्हाला ताज हॉटेलमध्ये एक दिवस राहण्याचा खर्च किती ते माहिती आहे का?
एका अहवालानुसार, आजच्या तारखेला ताज हॉटेलमध्ये एक दिवस राहण्यासाठी किमान २२ हजारे ते ७८ हजार पर्यंत खर्च येऊ शकतो.
ऐवढेच नाही तर ताजमध्ये एका व्यक्तीला जेवणसाठी एका वेळेसाठी अंदाजे १३,०००रुपये खर्च करावा लागतो.