Surabhi Jayashree Jagdish
एलोवेरा जेलमध्ये औषधी गुण मोठ्या प्रमाणात असतात. म्हणूनच ते नैसर्गिक उपचारासाठी उपयुक्त मानलं जातं. त्वचा जपण्यासाठी हा एक सोपा पर्याय आहे.
एलोवेरा जेल त्वचेसाठी खूप फायदेशीर असतं. त्वचा मऊ आणि निरोगी ठेवण्यास जेल फायदेशीर ठरतं. अनेक स्किन केअर प्रॉडक्टमध्ये त्याचा वापर होतो.
दिवसात एलोवेरा जेल कधी लावावं असा प्रश्न अनेकांना असतो. योग्य वेळ निवडल्यास चांगला फायदा होतो.
रात्री झोपण्यापूर्वी एलोवेरा जेल लावण्याचा सल्ला दिला जातो. रात्री आपण शांत असल्याने शरीराची आणि त्वचेची हालचाल नसते. अशावेळी हे जेल योग्य पद्धतीने काम करतं.
रात्रभर जेल त्वचेवर राहिल्यास चांगलं पोषण मिळतं. त्वचेतील कोरडेपणा कमी होण्यास मदत होतो. यामुळे त्वचा फ्रेश आणि हायड्रेटेड राहते.
पुरळ आणि डाग कमी करण्यासाठीही एलोवेरा जेल वापरता येतं. त्वचा फ्रेश ठेवण्यास ते मदत करतं. नियमित वापर केल्यास फरक दिसू शकतो.
एलोवेरा जेल लावण्यापूर्वी सर्वप्रथम चेहरा नीट धुऊन स्वच्छ करून घ्या. यानंतर जेल लावा. नियमितपणे याचा वापर केल्यास फरक दिसू शकतो.