What Is PMS | मासिक पाळी येण्यापू्र्वी मूड स्विंग्स का होतात?

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

नैसर्गिक प्रक्रिया

मासिक पाळी (periods) ही एक नैसर्गिक प्रक्रिया असून प्रत्येक मुलीला, महिलेला आयुष्यात त्याचा सामना करावाच लागतो.

Before Menstruation | Yandex

महिला

महिन्यातील ‘ते’ चार दिवस सर्व महिलांसाठी सारखेच नसतात. कोणाला कमी त्रास होतो, तर कोणाला जास्त.

Before Menstruation | Yandex

पीरियड्स येण्यापूर्वी

या काळात पोटदुखी, पाठदुखी, ओटीपोट दुखणं , हेवी फ्लो, अशा अनेक समस्यांचा सामनाही करावा लागतो. पीरियड्स येण्यापूर्वी महिलांमध्ये अनेक संकेत (symptoms) दिसू लागतात, पण काहींमध्ये ही लक्षणे दिसतही नाहीत.

Before Menstruation | Yandex

इमोशनल आणि शारीरिक बदल

काही महिलांमध्ये इमोशनल आणि शारीरिक बदल दिसून येतात. त्यांना प्रीमेंस्ट्रुल सिंड्रोम असे म्हटले जाते.

Before Menstruation | Yandex

पीएमएस म्हणजे काय ?

पीएमएस म्हणजे प्रीमेंस्ट्रुल सिंड्रोम (Premenstrual syndrome -PMS). बऱ्याच महिला अशा असतात, ज्यांना पाळी सुरू होण्यापूर्वी काही लक्षणे जाणवतात. उदा- चिडचिडेपणा, स्तनांमध्ये वेदना होणे किंवा सूज येणे, इत्यादी.

Before Menstruation | Yandex

मूड स्विंग

पाळी सुरू होण्यापूर्वी होणाऱ्या मूड स्विंगचे मुख्य कारण म्हणजे, शरीरात होणारा हार्मोनल बदल, ते मॅनेज करण्यासाठी तुम्ही डाएट अथवा आहारात बदल केला पाहिजे.

Before Menstruation | Yandex

शारीरिक समस्या

मूड स्विंग होण्यामागे काही शारीरिक समस्यादेखील असू शकतात. सतत थकवा जाणवणे, स्नायूंमध्ये वेदना होणे, असा त्रास असू शकतो. यामुळे वारंवार चिडचिड होते, राग येऊ शकतो. अशा वेळी तुम्ही कॅल्शिअम आणि मॅग्नेशिअमच्या सप्लीमेंट्सचे सेवन करू शकता.

Before Menstruation | Yandex

पीएमएसची लक्षणे

पीएमएसची लक्षणे दूर करायची असतील तर तुम्ही मेडिटेशन आणि व्यायामाची मदतही घेऊ शकता. ॲरोबिक्स, सायकलिंग, पोहोणे, जॉगिंग असे विविध प्रकारचे व्यायाम तुम्ही करू शकता.

Before Menstruation | Yandex

स्ट्रेस घेऊ नका

अशा काळात अजिबात स्ट्रेस घेऊ नका. तणाव कमी करण्यासाठी आराम करा. ध्यान करणे, योगासने करावीत. यामुळे इमोशनल संतुलन सुधारण्यास मदत मिळते.

Before Menstruation | Yandex

Next : Eye Flu | डोळ्यांचा फ्लू अचानक एवढा का पसरतोय?

Eye Flu | Yandex