Shraddha Thik
तरुणांमध्ये लग्नाचा नवा ट्रेंड पाहायला मिळत आहे. त्यांना त्यांच्या लग्नाचा खर्च स्वत: उचलायचा असतो.
साधारणपणे मुलांच्या लग्नाची जबाबदारी त्यांच्या पालकांवर असते. अनेक पालक यासाठी बचतही करतात.
मुलांनी स्वतःच्या लग्नाचा खर्च उचलणे ही चांगली गोष्ट आहे. परंतु, यासाठी कर्ज घेणे योग्य नाही.
ऑनलाईन शॉपिंग करताना, ‘आता खरेदी करा, नंतर पेमेंट करा’ (Shop Now, Pay Later) हा पर्याय तुम्हाला मिळतो. तसाच पर्याय आता लग्नाच्या बाबतीतही होत आहे.
ट्रॅव्हल फायनान्स प्लॅटफॉर्म SanKash ने ही जोरदार योजना आणली आहे. त्यामुळे गरजेच्या वेळी वधू-वराच्या पित्याची धांदल उडणार नाही. त्याला कोणाकडे हात पसरावे लागणार नाही.
ग्राहकांना या योजनेतंर्गत जास्तीत जास्त 12 महिन्यांसाठी 25 लाख रुपयांचे कर्ज मिळू शकते.
लग्नासाठी तुमचे बजेट कमी असेल तर बजेट कमी करण्याचा विचार करावा. वास्तविक, लग्नानंतर कर्ज फेडण्याचे ओझे चांगले नाही. MNPL वापरायचे असेल तर त्याचा योग्य विचार करावा.