Brain Fog: ब्रेन फॉग म्हणजे काय? कारणे कोणती?

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

ब्रेन फॉग म्हणजे काय?

ब्रेन फॉग हा आजार नाही तर हे मेंदू थकल्याचे लक्षण आहे. यामध्ये विचार करण्यात अडचण येणे आणि लक्ष केंद्रित करणे कठीण होणे अशा गोष्टी घडतात. तसेच तुम्ही गोष्टी विसरायला सुरुवात करता.

Brain | yandex

झोपेचा अभाव

दररोज पुरेशी झोप न घेणे किंवा झोप पूर्ण न होणे हे ब्रेन फॉगचे सर्वात मोठे कारण आहे. जेव्हा मेंदूला विश्रांती मिळत नाही तेव्हा त्याचे कार्य प्रभावित होते. मेंदूचा विचार करण्याची आणि लक्षात ठेवण्याची शक्तीवर परिणाम होतो.

brain | yandex

स्क्रीन टाइम

तासनतास फोन, लॅपटॉप आणि टीव्ही बघण्यात घालवल्याने मेंदूवर जास्त ताण येतो. यामुळे लक्ष विचलित होते, डोळे थकतात आणि मानसिक थकवा जाणवतो, ज्यामुळे ब्रेन फॉग होतो.

brain | freepik

प्रोसेस्ड फूड

जास्त साखर, जंक फूड आणि प्रोसेस्ड फूड मेंदूवर परिणाम करतात. जेव्हा शरीराला आवश्यक पोषण मिळत नाही तेव्हा मेंदूच्या पेशींना योग्यरित्या कार्य करण्यास अडथळा येतो.

brain | Canva

पाण्याची कमतरता

दिवसभर शरीराला आवश्यक पाणी न प्यायल्यास मेंदूच्या पेशी योग्यरित्या कार्य करत नाहीत. यामुळे विचार करण्याच्या आणि समजून घेण्याच्या क्षमतेवर गंभीर परिणाम होतो.

brain | yandex

तणाव

सतत ताणतणाव राहिल्याने मेंदू थकतो. मेंदूवर जास्त दबाव आल्याने तो विचार करण्याची क्षमता गमावू लागतो आणि स्पष्टपणे विचार करणे कठीण होते.

brain | google

शारीरिक हालचालींचा अभाव

जर तुम्ही दिवसभर बसून राहता आणि व्यायाम करत नसाल तर मेंदूला होणारा ऑक्सिजन आणि रक्तपुरवठा कमी होतो. यामुळे मेंदूला कार्य करण्यास अडथळा निर्माण होतो.

brain | freepik

NEXT: वास्तुनुसार, घरात घड्याळ कोणत्या दिशेला लावावे?

vastu | yandex
येथे क्लिक करा