Manasvi Choudhary
पावसाळ्यात हवामानात थंड पणा असतो अशा वातावरणात गरम किंवा कोमट पाण्याने आंघोळ करणे किंवा केस धुणे आरोग्यासाठी फायदेशीर असले तरी अनेकजण थंड पाण्याने केस धुतात.
थंड पाण्याने केस धुतल्याने शरीरावर काय परिणाम होतो? ते या वेबस्टोरीतून जाणून घ्या.
थंड पाण्याने केस धुतल्यामुळे केसांच्या मुळाजवळची मृत त्वचा नष्ट होते ज्यामुळे केस तुटण्याचे प्रमाण कमी होते आणि केसांमधील ओलावा टिकून राहतो.
थंड पाण्यामुळे टाळूवरची त्वचा स्वच्छ होते. यामुळे टाळूमध्ये धूळ किंवा घाण राहत नाही. केस देखील निरोगी राहतात.
गरम पाण्यामुळे केसांची मुळे कमजोर होतात, केस कोरडे होतात तर थंड पाण्यामुळे केस मऊ, चमकदार आणि निरोगी राहतात.
तुम्हाला जर सर्दी- खोकल्याचा त्रास असेल तर तुम्ही थंड पाण्याऐवजी कोमट पाण्याचा वापर करा. थंड पाण्याने केस धुतल्यास शरीराचे तापमान बदलते यामुळे आरोग्याच्या समस्या उद्भवू शकतात.
ज्यांना मायग्रेन, डोकेदुखीचा त्रास आहे अश्या व्यक्तींनी पावसाळ्यात थंड पाण्याने केस धुणे टाळावे. पावसाळ्यात थंड पाण्याने केस धुणे टाळावे.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.