Manasvi Choudhary
अनेकांना रात्री उशिरा झोपण्याची सवय असते. रात्री उशिरा २ -३ वाजता झोपल्याने आरोग्यावर गंभीर परिणाम होतो.
रात्री काम करत राहणे , सतत मोबाईल पाहत राहणे, टिव्ही पाहणे ही उशिरा झोपण्याची मुख्य लक्षणे आहेत.
रात्री उशिरापर्यंत जागे राहिल्याने हार्मोनल असंतुलन बिघडते यामुळे शरीराचे चक्र बदलते.
रात्री उशिरापर्यंत जागे राहिल्याने भूक लागते यामुळे वजन वाढण्याची देखील समस्या उद्भवू शकते.
सततच्या अपुऱ्या झोपेमुळे चिडचिड वाढणे, नैराश्य एकाग्रता कमी होणे आणि तीव्र मानसिक ताण या समस्या उद्भवतात.
रात्री उशिरापर्यंत जागे राहणाऱ्या लोकांमध्ये उच्च रक्तदाब वाढण्याची समस्या उद्भवते यामुळे मधुमेह आणि हृदयविकार होतात.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.