Manasvi Choudhary
भुईमुगाचे दाणे अत्यंत पौष्टिक पदार्थापैकी एक आहे. भुईमुगाचे दणे नियमितपणे खाल्ल्याने शरीरावर अनेक फायदे होतात.
भुईमुगाचे दाणे खाल्ल्याने शरीराला उर्जा मिळते थकवा दूर होण्यास मदत होते.
भुईमुगाचया दाण्यामध्ये मोनोअनसॅच्युरेटेड फॅटी एसिड्स असतात, जे शरीरातील वाईट कोलेस्ट्रॉल कमी करून चांगले कोलेस्ट्रॉल वाढवण्यास मदत करतात. यामुळे हृदयविकाराचा धोका कमी होतो.
भुईमुगाच्या दाण्यामध्ये कॅलरीज जास्त असल्या, तरी त्यात फायबर आणि प्रोटीन भरपूर प्रमाणात असते. यामुळे पोट भरल्यासारखे वाटते आणि वारंवार भूक लागत नाही.
शेंगदाण्यामध्ये व्हिटॅमिन बी-३ (नियासिन) आणि व्हिटॅमिन ई भरपूर असते, जे मेंदूचे कार्य सुधारण्यास आणि स्मरणशक्ती तीक्ष्ण ठेवण्यास मदत करतात.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.