Surabhi Jayashree Jagdish
अनेकदा लोकांच्या मनात प्रश्न असतो की, व्यक्तीच्या मृत्यूनंतर फेसबुक अकाउंटचं काय होते?
सोशल मीडिया ॲप्समध्ये अशी सेटिंग आहे जी मृत्यूनंतर तुमचे खाते बंद करू शकते.
बऱ्याच लोकांना त्यांच्या मृत्यूनंतर त्यांचं खातं दुसऱ्याने सुरु ठेवावं असं वाटत नाही, अशा लोकांसाठी एक सेटिंग खूप उपयुक्त आहे.
Facebook वर तुम्हाला लेगसी कॉन्टॅक्ट शेअर करण्याचा पर्याय मिळतो. या अंतर्गत लोकांना मृत्यूनंतरही प्रोफाइल दिसू शकतं.
या सेटिंगचा फायदा घेण्यासाठी युझरला फेसबुकच्या लेगसी सेटिंग्जमध्ये कॉन्टॅक्ट जोडावा लागेल.
याचा अर्थ असा की, तुमच्या मृत्यूनंतरही लोक तुमच्या प्रोफाइलवरील फोटो आणि व्हिडिओ पाहू आणि लाईक करू शकतात.
यावर जे काही पोस्ट केलं जाईल ते इतर युझर्सना दिसेल परंतु इतर कोणीही या अकाऊंटवर नियंत्रण ठेवू शकणार नाही.