Sakshi Sunil Jadhav
मकरसंक्रात हा अत्यंत शुभ सण मानला जातो. त्यामुळे या दिवशी लोक मोठ्या संख्येने दान करतात. याचे फायदे आपण जाणून घेणार आहोत.
हिंदू धर्मानुसार संक्रातीला खिचडी दान केल्याने मोठे पुण्य मिळते आणि पापांचा नाश होतो.
गरिबांना अन्नदान केल्याने आर्थिक अडचणी कमी होतात, अशी श्रद्धा आहे.
खिचडी सात्त्विक आणि पचायला हलकी असल्यामुळे तिच्या दानामुळे आरोग्य सुधारतं, असे मानले जातं.
काही ज्योतिषशास्त्रानुसार खिचडी दान केल्याने शनी दोष व नकारात्मक ग्रह परिणाम कमी होतात.
अन्नदान केल्याने मानसिक समाधान व सकारात्मक ऊर्जा मिळते.
सामाजिक दृष्टिकोनातून पाहता, खिचडी दान केल्याने गरजू व्यक्तीचे पोट भरते.
धार्मिक श्रद्धेनुसार खिचडी दान करणाऱ्या व्यक्तीवर संकटं कमी येतात.
नियमित दानामुळे घरात आनंद, शांतता आणि समृद्धी नांदते, असे मानले जाते.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.