Dhanshri Shintre
देशात पुन्हा एकदा कोविड-१९चा प्रादुर्भाव वाढताना दिसतोय, रुग्णसंख्येत हळूहळू वाढ होत आहे.
अशा पार्श्वभूमीवर JN.1 हा नवा कोविड प्रकार नक्की काय आहे आणि त्याची लक्षणं कोणती, समजून घ्या.
JN.1 हा कोरोना विषाणूचा नवा प्रकार असून तो ओमिक्रॉनच्या BA.2.86 कुटुंबातील आहे. ऑगस्ट 2023 मध्ये तो प्रथम आढळला.
JN.1 प्रकारात सुमारे 30 म्युटेशन्स आहेत, ज्यामुळे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत होते आणि विषाणूशी लढणं अधिक कठीण ठरतं.
कोरडा खोकला, सर्दी, ताप, घसा खवखवणे, डोकेदुखी, थकवा, वास व चव जाणे, अतिसार ही JN.1 ची सामान्य लक्षणं आहेत.
१९ मे २०२५ रोजी भारतातील सक्रिय कोरोनाबाधितांची संख्या ५७ वर पोहोचली, जी गेल्या एका वर्षातील सर्वाधिक नोंदवलेली संख्या आहे.
आरोग्य महासंचालकांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत, तज्ञांनी भारतातील कोविड परिस्थिती नियंत्रणात असल्याचे सांगितले आणि काळजी करण्याची गरज नाही असे निष्कर्ष दिला.