Surabhi Jayashree Jagdish
भारतातील विविध राज्यांमधून तसेच परदेशातून हजारो पर्यटक लाल किल्ल्याचा इतिहास जाणून घेण्यासाठी दिल्लीला येतात. हे किल्ले भारताच्या सांस्कृतिक वारशाचे प्रतीक मानलं जातं.
लाल किल्ल्याचा इतिहास अत्यंत रोचक आहे आणि तो मुघल सम्राट शाहजहांनी बांधला होता. या किल्ल्यात आजही अनेक ऐतिहासिक वास्तू आणि स्मृतीचिन्हे पाहायला मिळतात. त्यामुळे इतिहासप्रेमींसाठी हे ठिकाण विशेष आकर्षणाचे केंद्र आहे.
शाहजहांनी लाल किल्ल्यात आपल्या राण्यांसाठी खास व्यवस्था केली होती. संध्याकाळी त्या याठिकाणी खास वेळ घालवत असत. या किल्ल्याच्या बांधकामासाठी तब्बल १० वर्षे लागली होती.
लाल किल्ल्यात ‘रंग महल’ नावाची एक खास जागा होती, जिथे राण्यांच्या निवासाची व्यवस्था होती.
राण्या याठिकाणी दिवसभर सजण्याचा आणि सौंदर्यवर्धनाचा वेळ घालवत असत. ही जागा सौंदर्य आणि वैभवाचे प्रतीक मानली जात होती.
याशिवाय लाल किल्ल्याचा परिसर अत्यंत रमणीय होता. कारण त्याच्या मागे यमुना नदी वाहत होती. ही यमुना नदी पर्यटकांसाठीही एक विशेष आकर्षण होती. निसर्गाच्या सान्निध्यात हे ठिकाण अधिक सुंदर भासत असे.
रात्रीच्या वेळी बादशाह, बेगम आणि राण्या यमुना नदीत स्नानासाठी जात असत. दिवसभराच्या व्यस्ततेनंतर बादशाह रात्रीच यमुनेत स्नान करून आपला खास वेळ घालवत असत.
रात्रीच्या वेळी यमुना नदीत अनेक नौकांची व्यवस्था केली जात असे. त्या काळात यमुनेचे पाणी गंगेसारखेच स्वच्छ आणि निर्मळ होते. त्यामुळे यमुना नदी राजघराण्याच्या विश्रांतीसाठी आदर्श ठिकाण ठरले होते.