Surabhi Jagdish
फळाची बी खाल्ली की पोटात झाड उगवेल, असं लहानपणी तुम्हाला कोणीतरी खोटं सांगितलं असेलच.
मात्र फळाची बी पोटात गेल्यावर नेमकं काय होईल हे तुम्हाला माहितीये का?
अनेकांना कलिंगड खायला आवडतं. पण आज कलिंगडाची बी खल्ल्यावर काय होतं हे जाणून घेऊया.
कलिंगडची बी खाल्ली तर त्याते फायदे आणि तोटे दोन्ही शरीराला होतात.
कलिंगडाच्या बियांमध्ये मॅग्नेशियम असतं. यामुळे रक्तदाब नियंत्रित करून आणि हृदयाचं आरोग्य राखण्यासाठी मदत होते.
कलिंगडाच्या बियांमध्ये फायबर त्याचप्रमाणे अनसॅच्युरेटड फॅट्स असतात. यामुळे पाचन क्रिया सुधारते.
मात्र ज्या व्यक्तींना किडनीचा आजार आहे, त्यांनी कलिंगडच्या बिया खाऊ नयेत.