Message Codes: मेसेजवरील कोड्स म्हणजे काय? जाणून घ्या त्यांचा नेमका अर्थ

Surabhi Jayashree Jagdish

मेसेज कोड्स म्हणजे नेमकं काय?

मोबाईलवर येणाऱ्या अनेक एसएमएसमध्ये काही विशिष्ट इंग्रजी अक्षरे किंवा कोड्स दिसतात. हे कोड्स त्या मेसेजचा प्रकार आणि तो कोणाकडून पाठवला गेला आहे, याची माहिती देतात. त्यामुळे मेसेज वाचण्यापूर्वीच त्याचा उद्देश ओळखण्यास मदत होते.

Government SMS | saam tv

कोड्सकडे दुर्लक्ष

बहुतेक लोक मेसेजमधील मजकूर वाचतात, पण त्यावरील कोड्सकडे लक्ष देत नाहीत. त्यामुळे महत्त्वाची माहिती त्यांच्या लक्षात येत नाही. हे कोड्स समजून घेतल्यास मेसेजची विश्वासार्हता तपासणं अधिक सोपं होतं.

Service SMS | saam tv

'G' कोडचा अर्थ

मेसेजवर 'G' हा कोड असल्यास तो सरकारी विभागाकडून पाठवलेला असल्याचं दर्शवतो. अशा मेसेजमध्ये सरकारी योजना, सूचना किंवा अधिकृत माहिती दिलेली असते. त्यामुळे अशा मेसेजकडे गांभीर्याने पाहणं आवश्यक असतं.

SMS Identification | saam tv

'T' कोडचा अर्थ

'T' म्हणजे Transactional अर्थात व्यवहाराशी संबंधित मेसेज. हे मेसेज प्रामुख्याने बँक किंवा आर्थिक संस्थांकडून पाठवले जातात. खात्यातील व्यवहार, ओटीपी किंवा पेमेंटची माहिती अशा मेसेजद्वारे मिळते.

Mobile Message Tips | saam tv

'S' कोडचा अर्थ काय?

'S' म्हणजे Service अर्थात सेवा-संबंधित मेसेज. हे मेसेज मोबाईल कंपन्या, ई-कॉमर्स किंवा इतर सेवा देणाऱ्या कंपन्यांकडून पाठवले जातात. उदाहरणार्थ, रिचार्ज, ऑर्डर अपडेट किंवा सेवा-सूचना अशा प्रकारची माहिती यात असू शकते.

SMS Security | saam tv

'P' कोडचा अर्थ काय?

'P' म्हणजे Promotional अर्थात प्रचारात्मक मेसेज. या मेसेजमध्ये विविध उत्पादनं, ऑफर्स किंवा सेवांचा प्रचार केला जातो. अनेकदा ग्राहकांना एखादी वस्तू खरेदी करण्यासाठी किंवा सेवा वापरण्यासाठी प्रोत्साहित करण्याचा प्रयत्न अशा मेसेजमधून केला जातो.

Fake SMS Alert | saam tv

कोड्स महत्त्वं

मेसेज कोड्सची माहिती असल्यास कोणता मेसेज अधिकृत आहे आणि कोणता संशयास्पद असू शकतो, याचा अंदाज लावणं सोपं जातं. त्यामुळे फसवणूक करणारे किंवा बनावट मेसेज ओळखताना अधिक सतर्क राहता येतं.

Banking SMS | saam tv

Kolhapur Tourism: खरंच लोणावळा-खंडाळा विसराल; कोल्हापूरपासून फक्त २१ किमी लांब आहे हे हिल स्टेशन

Safety | saam tv
येथे क्लिक करा