Sakshi Sunil Jadhav
एक कप सोललेल्या डाळिंबातून फायबर, नैसर्गिक कार्बोहायड्रेट्स, अँटिऑक्सिडंट्स आणि इतर पोषक घटक मिळतात. त्यासोबत अनेक फायदे मिळतात.
डाळिंबातले नैसर्गिक साखर आणि फायबरमुळे शरीराला हळूहळू ऊर्जा मिळायला मदत होते.
डाळिंबातले फायबर आतड्यांची हालचाल सुरळीत ठेवण्यास आणि पचनक्रिया व्यवस्थित राहण्यास मदत करते.
डाळिंबात असलेले अँटिऑक्सिडंट्स रक्तवाहिन्यांना ऑक्सिडेटिव्ह तणावापासून संरक्षण द्यायला मदत करू शकतात.
डाळिंबातून व्हिटॅमिन सी आणि इतर वनस्पचीजन्य पोषक घटक मिळतात, जे शरीराच्या रोगप्रतिकारक यंत्रणेला आधार देतात.
डाळिंबातल्या अँटिऑक्सिडंट्स ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेसशी लढायला मदत करत असल्याने त्वचेच्या आरोग्याला फायदा होऊ शकतो.
एक कप डाळिंबातून सुमारे ५.५ ग्रॅम फायबर मिळू शकते, त्यामुळे पोट भरल्यासारखे वाटण्यास आणि नियमित पचनास मदत होते.