Dhanshri Shintre
जन्माचा महिना व्यक्तिमत्त्वावर प्रभाव टाकतो. प्रत्येक महिन्यात जन्मलेल्या लोकांचा स्वभाव वेगळा असतो, ज्यावरून त्यांची ओळख पटते.
या व्यक्तींचा स्वभाव फणसासारखा असतो. बाहेरून कठोर व काटेरी, पण आतून अतिशय मृदू, गोड आणि संवेदनशील.
या व्यक्ती नेहमीच शिकण्यास उत्सुक असतात. इतरांकडून नवीन गोष्टी आत्मसात करून स्वतःला अधिक चांगले घडवण्याची त्यांची वृत्ती असते.
सप्टेंबरमध्ये जन्मलेले लोक परिस्थितीनुसार स्वतःला बदलतात, काळाशी जुळवून घेत सतत प्रगतीच्या दिशेने वाटचाल करत पुढे सरकतात.
हे व्यक्ती सहसा प्रेमात लवकर पडत नाहीत, पण एकदा नातं जडलं की ते आयुष्यभर प्रामाणिकपणे टिकवण्याचा प्रयत्न करतात.
या व्यक्तींची इच्छाशक्ती अत्यंत मजबूत असते. ठरवलेले उद्दिष्ट गाठण्यासाठी ते मेहनत घेतात आणि कोणत्याही आव्हानांना धैर्याने सामोरे जातात.
या व्यक्तींना सहज राग येतो आणि रागाच्या भरात ते स्वतःवर नियंत्रण ठेवू शकत नाहीत, ज्यामुळे निर्णयांवर परिणाम होतो.
असं मानलं जातं की सप्टेंबरमध्ये जन्मलेले लोक आपल्या चुका सहसा मान्य करत नाहीत आणि स्वतःला योग्य ठरवण्याचा प्रयत्न करतात.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं कुठलेही समर्थन अथवा दावा करत नाही.