Priya More
व्हेल माशाची उलटी म्हणजेच अॅम्बरग्रीसला खूपच महत्व आहे. ही उलटी कोट्यवधी रूपयांना विकली जाते.
सोनं आणि हिऱ्यापेक्षा जास्त किमतीमध्ये व्हेल माशाची उलटी विकली जाते. आंतरराष्ट्रीय बाजारात तिला जास्त महत्व आहे.
व्हेल माशाच्या उलटीची किंमत कोट्यवधी असल्यामुळे त्याला समुद्रातील तरंगतं सोनं असं देखील म्हटलं जातं.
व्हेल माशाच्या १ किलो उलटीची किंमत १ कोटी तर ५ किलो उलटीची किंमत ५ कोटींच्या आसपास आहे.
व्हेल माशाच्या उलटीपासून सुगंधित अगरबत्ती आणि धूप तयार केले जाते. परफ्यूम तयार करण्यासाठी तिचा वापर केला जातो.
व्हेलच्या उलटीचा तुकडा सोबत ठेवल्यास प्लेग रोग रोखण्यात मदत होतो असं युरोपियन लोक म्हणतात.
औषधांमध्ये व्हेल माशाच्या उलटीचा वापर केला जातो. सेक्सशी संबंधित औषधांसाठी त्याचा वापर होतो.
व्हेल माशाच्या उलटीचा घाणेरडा वास येतो. ती मेणासारखी दिसते.
व्हेल माशाने उलटी केल्यानंतर समुद्रातील खाऱ्या पाण्यामुळे आणि सूर्यकिरणांमुळे ती चिकट होते.