Lose Belly Fat : दैनंदिन जीवनातील 'या' चुका टाळा; पोटाची चरबी झटपट होईल कमी अन् कंबर दिसेल स्लिम

Shreya Maskar

वजन कमी करणे

वजन कमी करण्यासाठी आपण मोठे डाएट प्लान करतो, जास्त शारीरिक व्यायामावर भर देतो, मात्र एवढे करूनही कधी कधी वजन कमी होत नाही. त्यामुळे वजन कमी करण्यासाठी व्यायाम आणि डाएटसोबतच रोजच्या जीवनात हे बदल करणेही खूपच गरजेचे आहे.

Lose weight | pinterest

जंक फूड टाळा

वजन कमी करण्यासाठी खाण्याच्या सवयी बदला. बाहेरचे खाणे पूर्णपणे बंद करा. मसालेदार, तळलेले पदार्थ खाणे टाळा. घरचे गरमागरम हेल्दी जेवण आणि योग्य डाएट प्लान फॉलो करा.

Avoid junk food | pinterest

चालणे गरजेचे

वजन कमी करण्यासाठी रोज सकाळी उठल्यावर आणि दुपारी-रात्री जेवल्यावर २० - २५ मिनिटे चाला. यामुळे अन्नाचे पचन चांगले होते. रोज पुरेशी झोप घ्या.

Need to walk | pinterest

सकाळचा नाश्ता महत्त्वाचा

लोक बारीक होण्यासाठी सकाळचा नाश्ता सोडतात, जे चुकीचे आहे. वजन कमी करण्यासाठी चांगला प्रोटीनयुक्त नाश्ता करा.

Breakfast is important | pinterest

भाज्यांची निवड

चरबी वाढवणाऱ्या भाज्या खाणे टाळा. या भाज्यांमुळे रक्तातील साखर वाढते आणि भूक वाढते. काही भाज्यांमध्ये भरपूर स्टार्च असतो, जो शरीर पचवते आणि त्यातील अतिरिक्त साखरेचे चरबीमध्ये रूपांतर होते. यामुळे वजन वाढते.

vegetables | pinterest

छोटे बदल

दुधाच्या चहाऐवजी ग्रीन टी प्या. ऑफिसला जाताना लिफ्टऐवजी पायऱ्यांचा वापर करा. दुपारच्या जेवणात भरपूर मॅग्नेशियम घ्या आणि तुमच्या ताटात हिरव्या भाज्यांचा समावेश असून द्या.

green tea | pinterest

टेन्शन सोडा

वजन कमी करण्यासाठी मानसिक आरोग्य चांगले राहणे देखील तितकेच गरजेचे आहे. तीव्र तणावामुळे कॉर्टिसोल हे संप्रेरक वाढते, ज्यामुळे शरीरात पोटावर अतिरिक्त चरबी साठते.

tension | pinterest

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या, डॉक्टरांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

Note | pinterest

NEXT : सकाळी उठल्यावर करा 'या' ५ गोष्टी, पोटाची ढेरी अन् कंबरेचा घेर १५ दिवसांत होईल कमी

Lose Belly Fat | AI PHOTO
येथे क्लिक करा...