Shruti Vilas Kadam
शेंगदाण्यात मखान्यांच्या तुलनेत जास्त प्रोटीन असते, त्यामुळे मसल्स बिल्डिंगसाठी शेंगदाणे अधिक फायदेशीर ठरतात.
मखाने कमी कॅलरीचे असतात, त्यामुळे वजन कमी करताना ते अधिक योग्य पर्याय मानले जातात.
शेंगदाण्यात हेल्दी फॅट्स जास्त असतात, तर मखाने लो-फॅट असतात, त्यामुळे वेट लॉससाठी मखाने फायदेशीर.
दोन्ही पदार्थ फायबरयुक्त असल्यामुळे भूक कमी लागते, पण मखाने हलके असल्यामुळे जास्त प्रमाणात खाता येतात.
मखाने पचायला हलके असतात, तर शेंगदाणे काही लोकांना जड जाऊ शकतात.
शेंगदाणे जास्त एनर्जी देतात, त्यामुळे वर्कआउट करणाऱ्यांसाठी ते चांगला पर्याय आहेत.
जर तुम्हाला कमी कॅलरी आणि हलका स्नॅक हवा असेल तर मखाने निवडा, आणि जास्त प्रोटीन हवे असल्यास शेंगदाणे खा.