Shruti Vilas Kadam
वजन कमी करताना गव्हाची पोळी आहारातून काढून टाकण्याची गरज नाही. मात्र चपातीचे प्रमाण तुमच्या दैनंदिन कॅलरी गरजेनुसार ठरवणे महत्त्वाचे आहे.
सामान्यतः वजन कमी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तीला दिवसातून सुमारे ३ ते ४ मध्यम आकाराच्या चपात्या योग्य ठरू शकतात. मात्र शारीरिक हालचाल आणि एकूण आहारानुसार प्रमाण बदलू शकते.
वजन कमी करण्यासाठी भात पूर्णपणे बंद करण्याची आवश्यकता नाही. मुख्य गोष्ट म्हणजे भाताचे प्रमाण आणि त्यासोबत घेतले जाणारे पदार्थ.
एका जेवणात साधारण १५० ते २०० ग्रॅम शिजवलेला भात हे योग्य प्रमाण मानले जाते. मात्र वैयक्तिक कॅलरी गरजेनुसार हे प्रमाण बदलू शकते.
पोळी किंवा भातासोबत डाळ, कडधान्ये, पनीर, अंडी किंवा इतर प्रथिने आणि भरपूर भाज्या घेतल्याने जेवण अधिक संतुलित होते.
एकाच जेवणात दोन्ही पदार्थ मोठ्या प्रमाणात घेतल्यास कार्बोहायड्रेट आणि कॅलरीचे प्रमाण वाढू शकते. त्यामुळे प्रमाणावर नियंत्रण ठेवणे महत्त्वाचे आहे.
वजन कमी होणे हे एकूण कॅलरी सेवन, शारीरिक हालचाल, प्रथिने, फायबर आणि सातत्यपूर्ण आहारावर अवलंबून असते.