कोमल दामुद्रे
बदलेलेली जीवनशैली व कामाच्या व्यापामुळे अनेकजण वाढत्या वजनामुळे चिंतेत आहेत.
जर तुम्ही देखील वाढत्या वजनामुळे त्रस्त झाले आहात तर रोज रात्री झोपण्यापूर्वी 'हे' करून पहा. वजन होईल कमी , जाणुन घेऊया 'हे' सोप्पे उपाय -
रात्री झोपण्यापूर्वी कमीत कमी २ तास आधी जेवून घ्यायची सवय लावा. यामुळे जेवन लवकर पचायला मदत होते आणि पोटांच्या आजारांपासुन सुटका होईल.
कधीही रात्री पूर्ण पोटभरुन जेवू नका. जेवढी भूक असेल त्यापेक्षा थोड कमी जेवा आणि चावून अन्न खा, याने चरबी वाढणे थांबते.
रात्रीच्या जेवनानंतर चेरी खाल्याने रात्रीची झोप फार छान लागते, आणि वजन ही कमी होते. चेरीमध्ये असलेल्या एंटीऑक्सीडेंट पोटांच्या समस्येवर मात करते.
झोपण्यापूर्वी ग्रीन टी चे सेवन करण्याची सवय लावा ज्याने मेटबॉलिज्म जास्त प्रमाणात वाढते आणि चरबी बर्न होण्यास मदत होते.
रात्री जेवल्यानंतर शतपावली करायला सुरवात करा याने मेटबॉलिज्म स्थिर राहते आणि चरबी बर्न होण्यास मदत होते. त्यासाठी कमीत कमी रोज रात्रीच्या जेवनानंतर १ तास तरी शतपावली करा.