Shreya Maskar
फॅटी लिव्हर म्हणजे जेव्हा यकृतामध्ये (लिव्हरमध्ये) अतिरिक्त चरबी किंवा फॅटचे प्रमाण वाढते. आपल्या शरीरात फॅटी लिव्हरचे प्रमाण वाढू नये म्हणून या फळांचे सेवन करा.
सफरचंदात पेक्टिन, फायबर भरपूर प्रमाणात असते. सफरचंद खाल्ल्याने पोट आणि यकृत निरोगी राहण्यास मदत होते. सफरचंदासोबत थोडा सुकामेवा खाल्ल्यास तो एक उत्तम नाश्ता बनतो.
तुम्हाला बद्धकोष्ठतेचा त्रास होत असेल, तर कीवी खाण्यास सुरुवात करा. कीवी यकृताच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरते. त्यातील फायबर सहज पचते. तुम्ही दररोज सुमारे दोन कीवी सालीसकट खाऊ शकता.
रास्पबेरी हे देखील फायबरयुक्त फळ आहे. रास्पबेरी ग्रीक योगर्ट किंवा ओटमीलमध्ये मिसळून खा. त्यात साखर घालू नका. यामुळे नैसर्गिक साखर आणि भरपूर फायबर मिळेल.
निरोगी यकृत राखण्यासाठी डाळिंब खा. डाळिंबाचे दाणे सॅलडमध्ये मिसळून खाणे फायदेशीर ठरते. यामुळे पोटाचे आरोग्य देखील चांगले राहते.
ॲव्होकॅडोमध्ये नैसर्गिक साखरेचे प्रमाण कमी आणि फायबरचे प्रमाण जास्त असते. जर तुम्ही टोस्ट किंवा ब्रेड खात असाल, तर त्यावर बटर किंवा चीजऐवजी ॲव्होकॅडो लावून पहा. हा नाश्त्यासाठी एक आरोग्यदायी पर्याय आहे.
ब्लूबेरी खाणे देखील तुमच्या यकृतासाठी खूप फायदेशीर आहे. ब्लूबेरी दही, ओटमील किंवा स्मूदीमध्ये घालून खा.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या, डॉक्टरांच्या सल्ल्यानं घ्यावीत.