Bharat Jadhav
लग्न सोहळ्यात मेहंदीला एक विशेष महत्त्व असते. वधूबरोबरच तिच्या बहिणी आणि मैत्रिणी हातांवर मेहंदी काढतात.
आता काळ बदलल्याप्रमाणे मेहंदीच्या डिझाईन्समध्येही बदल झाला आहे. आजकाल मिनिमल, 3D, अरेबिक आणि मंडला मेहंदीमध्ये अनेक नमुने पाहायला मिळतात.
फुलांच्या मेहंदीच्या नक्षी मुलींमध्ये खूप लोकप्रिय आहेत. त्या जास्त गडद दिसत नाहीत आणि एक परिपूर्ण लुक देतात. ही डिझाइन वधूच्या मैत्रिणींसाठी अगदी योग्य ठरेल. ही डिझाइन एक स्टायलिश लुक देईल.
ही हृदयाच्या आकाराची मेहंदीची डिझाइन खूपच अनोखी आणि आधुनिक आहे. यामध्ये फुलांची आणि पानांची नाजूक नक्षी काढण्यात आली आहे.
पारंपारिक मेहंदी डिझाइनमध्ये मोराच्या नक्षीचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. जर तुम्हाला तुमच्या मेहंदीला थोडा पारंपारिक स्पर्श द्यायचा असेल, तर ही मोराची मेहंदी नक्कीच ट्राय करा.
हाताच्या मागच्या भागावरही मेहंदी काढायची असेल तर ही डिझाईन चांगली आहे. ही कमळाची डिझाइनमध्ये सर्व बारकावे बोटांवर केंद्रित केले आहेत, ज्यामुळे संपूर्ण हातावर एक सुंदर कमळाची नक्षी तयार होते.
ही डिझाइन पारंपरिक आणि आधुनिक मेहंदीच्या डिझाइनचा एक सुंदर संगम आहे. जर तुम्ही एक वधू असाल आणि काहीतरी युनिक मेहंदीची डिझाइन हवी असेल तर हा उत्तम पर्याय आहे.