Sakshi Sunil Jadhav
श्रावण महिन्यात महिला प्रत्येक सोमवारी शिव मंदिरात जावून पूजा करते, अभिषेक करते. त्यावेळेस पुजेसाठी ती सुंदर साडी नेसते.
साडी नेसल्यावर महिलांना त्यांच्या बांगड्यांबद्दल खूप शंका असतात. कोणती बांगडी, कोणत्या साडीवर सुंदर दिसेल हे कळत नाही.
जर तुम्ही लाल रंगाची साडी नेसत असाल तर त्यावर गोल्डन रंगाच्या बांगड्या वापरू शकता.
श्रावण महिन्यात महिला हिरव्या रंगाच्या साड्या जास्त प्रमाणात नेसतात. त्यावर तुम्ही कुंदन वर्क असलेल्या बांगड्या वापरू शकते.
निळ्या रंगाच्या साडीवर तुम्ही सिल्वर रंगाच्या बांगड्या वापरू शकता. त्याने तुम्हाला रॉयल लूक मिळेल.
पिवळ्या रंगाच्या साडीवर हिरव्या रंगाच्या बांगड्या सुंदर दिसतात. कॉन्टरास्ट कलर तुम्हाला जास्त रेखीव बनवतो.
गुलाबी साडीसोबत तुम्ही गोल्डन आणि हिरव्या रंगाच्या बांगड्या वापरू शकता.
कधी-कधी आपण पांढऱ्या रंगाची साडी नेसून महत्त्वाच्या कार्यक्रमांना जातो. अशावेळेस त्यावर पर्ल डिजाइनच्या बांगड्या तुम्ही वापरू शकता.