Copper water benefits: रक्तवाहिन्यांमध्ये साचलेल्या कोलेस्ट्रॉलवर रामबाण उपाय आहे तांब्याच्या भांड्यातील पाणी, दिवसातून फक्त 'या' वेळी प्या

Surabhi Jayashree Jagdish

तांब्याच्या भांड्यातील पाणी पिण्याची परंपरा

आजी-आजोबांच्या काळापासून तांब्याच्या भांड्यातील पाणी पिण्याची पद्धत प्रचलित आहे. आयुर्वेदानुसार, तांब्याच्या भांड्यात ८ ते १० तास ठेवलेल्या पाण्याला ‘ताम्रजल’ म्हणतात. या काळात पाण्यात तांब्याचे काही सूक्ष्म कण मिसळू शकतात.

Copper water and cholesterol | saam tv

बॅक्टेरियांची वाढ रोखण्यास मदत

२०१२ मध्ये नॅशनल लायब्ररी ऑफ मेडिसिनमध्ये प्रकाशित झालेल्या एका अभ्यासात तांब्याच्या भांड्यातील पाण्याचा बॅक्टेरियावरील परिणाम तपासण्यात आला होता. या अभ्यासात तांब्याच्या भांड्यात ठेवलेल्या पाण्यात ई. कोलाय या बॅक्टेरियांची वाढ रोखली जाऊ शकते, असं आढळलंय.

HDL cholesterol | saam tv

तांब्याच्या पाण्यातील गुणधर्म

तांब्यामध्ये बॅक्टेरियाची वाढ रोखण्याचे गुणधर्म असतात. योग्य परिस्थितीत तांब्याच्या संपर्कात आलेल्या पाण्यातील काही हानिकारक बॅक्टेरिया निष्क्रिय होऊ शकतात.

Heart health | saam tv

वाईट कोलेस्ट्रॉल

आयुर्वेदात तांब्याच्या भांड्यात ठेवलेल्या पाण्याचा वापर आरोग्यासाठी उपयुक्त मानला जातो. रक्तातील वाईट कोलेस्ट्रॉलचें प्रमाण वाढल्यास हृदयाच्या आरोग्याला धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रणात ठेवण्यासाठी योग्य आहार आणि नियमित व्यायाम यांना महत्त्व आहे.

Copper vessel | saam tv

हृदय, पचन आणि रोगप्रतिकारक शक्ती

रक्तातील कोलेस्ट्रॉलचं प्रमाण वाढल्यास रक्तवाहिन्यांमध्ये अडथळे निर्माण होण्याचा धोका वाढू शकतो. उच्च रक्तदाब आणि हार्ट अटॅक यांसारख्या समस्यांपासून दूर राहण्यासाठी संतुलित आहार आणि नियमित व्यायाम आवश्यक आहेत.

Regular exercise | saam tv

तांब्याच्या भांड्यातील पाणी

तांब्याच्या भांड्यात ठेवलेले पाणी पिण्याची पद्धत अनेक वर्षांपासून प्रचलित आहे. शरीराचं आरोग्य चांगलं राखण्यासाठी पुरेसं पाणी पिणं आणि संतुलित आहार घेणं महत्त्वाचं आहे. तांब्याच्या भांड्याचा वापर करताना ते स्वच्छ ठेवावं आणि पाण्यात तांब्याचे प्रमाण जास्त मिसळणार नाही याची काळजी घ्यावी.

Copper intake | saam tv

टीप

ही माहिती विविध सार्वजनिक स्रोतांवर आधारित असून केवळ सामान्य माहितीसाठी देण्यात आली आहे. या माहितीची स्वतंत्र वैद्यकीय पडताळणी आम्ही केलेली नाही. कोणतीही लक्षणे आढळल्यास स्वतः निष्कर्ष काढण्याऐवजी तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या.

- Cholesterol control | saam tv

Refrigerator placement: घरात भिंतीपासून किती अंतराच्या दूर ठेवला पाहिजे फ्रीज?

Refrigerator placement | saam tv
येथे क्लिक करा