Sakshi Sunil Jadhav
मुंबईच्या गजबजाटापासून लांब, थंड हवा, डोंगररांगा, धबधबे आणि हिरवाई अनुभवायची असेल तर नेपाळपर्यंत जाण्याची गरज नाही. महाराष्ट्रातच, मुंबईच्याजवळ काही अशी ठिकाणं आहेत जी नेपाळसारखी वाटतात.
मुंबईजवळलचे हे एकमेव वाहन नसलेलं शांत हिलस्टेशन म्हणजे माथेरान. इथली धुकं, लाल माती आणि घनदाट जंगलं नेपाळची आठवण करून देतात. थंड हवा, घोडेस्वारी आणि व्ह्यू पॉइंट्स निसर्गप्रेमींना आकर्षित करतं.
हिरव्या डोंगररांगा, धबधबे आणि ढगांनी वेढलेलं लोणावळा नेपाळसारखा view देतं. भुशी डॅम, टायगर पॉइंट आणि किल्ले यामुळे पर्यटनासाठी हे ठिकाण लोकप्रिय आहे.
लोणावळ्याजवळ असलेलं खंडाळा शांत वातावरण, खोल दऱ्या आणि थंड हवामानासाठी ओळखलं जातं. ढगांमध्ये हरवलेले रस्ते तुम्हाला इथे पाहायला मिळतील.
सह्याद्रीच्या कुशीत वसलेलं भिमाशंकर घनदाट जंगलं, धबधबे आणि थंड हवेसाठी प्रसिद्ध आहे.
नाशिक जिल्ह्यात इगतपुरीचे ढगाळ हवामान, धबधबे आणि डोंगररांगां नेपाळसारख्या दिसतात.
आदिवासी संस्कृती, धबधबे आणि हिरवाईने नटलेलं जव्हार हे मुंबईजवळचं कमी प्रसिद्ध पण सुंदर ठिकाण आहे.
आर्थर लेक, रंधा धबधबा आणि पर्वतरांगांमुळे भंडारदऱ्याचे दृश्य सुंदर दिसतं. इथे नेपाळसारखा अनुभव येतो.