Shruti Vilas Kadam
२ चमचे कलिंगडाचा रस आणि १ चमचा बेसन घ्या. त्यात थोडे गुलाबपाणी मिसळून पेस्ट तयार करा.
कलिंगडामध्ये भरपूर पाणी आणि अँटीऑक्सिडंट्स असतात, जे त्वचेला हायड्रेट करून नैसर्गिक चमक देतात. बेसन त्वचा स्वच्छ करून ग्लो वाढवते.
बेसन हे नैसर्गिक क्लेन्झर आहे. कलिंगडासोबत वापरल्यास त्वचेतील घाण, तेल आणि मृत पेशी दूर होतात.
हा फेस पॅक त्वचेतील अतिरिक्त तेल नियंत्रित करतो, त्यामुळे पिंपल्स आणि अॅक्ने कमी होण्यास मदत होते.
उन्हामुळे झालेला टॅन कमी करण्यासाठी हा पॅक उपयोगी ठरतो. त्वचा उजळ आणि ताजी दिसते.
कलिंगड त्वचेला थंडावा देते, तर बेसन त्वचा मऊ आणि स्मूथ बनवते.
तयार पॅक चेहऱ्यावर लावा आणि १५-२० मिनिटे ठेवून कोमट पाण्याने धुवा. आठवड्यातून २ वेळा वापरल्यास चांगले परिणाम दिसतात.