Pulav Masala: एकदम टेस्टी पुलाव बनवायचाय? मग घरच्या घरी बनवा हा पुलाव मसाला

Surabhi Jayashree Jagdish

पुलाव

पुलाव बनवण्यासाठी घरच्या घरी खमंग आणि चविष्ट मसाला बनवणं खूप सोपं आहे.

पुलाव मसाला

तुमच्या पुलावाला बाजारात मिळणाऱ्या पुलावासारखीच अप्रतिम चव येईल. हा मसाला बनवून तुम्ही हवाबंद डब्यात ठेवून अनेक दिवस वापरू शकता.

साहित्य

३ मोठे चमचे धणे, १.५ मोठा चमचा जिरे, १ मोठा चमचा बडीशेप, १ छोटा चमचा काळी मिरी, ६-७ हिरव्या वेलची, २ मसाला वेलची, ४-५ दालचिनीचे तुकडे, ८-१० लवंग, २ तमालपत्र, १ स्टार एनीस,१/२ छोटा चमचा शहाजिरे, १/२ इंच जायफळ, १ जायपत्री, १ छोटा चमचा लाल तिखट, १/२ छोटा चमचा हळद, १ छोटा चमचा सुंठ पावडर, १/२ छोटा चमचा आमचूर पावडर

मसाले भाजा

एका कढईत किंवा पॅनमध्ये धने, जिरे, बडीशेप, काळी मिरी, हिरवी वेलची, मसाला वेलची, दालचिनी, लवंगा, तमालपत्र, स्टार एनीस आणि शहाजिरे हे सर्व अख्खे मसाले मंद आचेवर भाजून घ्या.

थंड होऊ द्या

हे मसाले हलके सोनेरी होईपर्यंत आणि त्यांचा छान सुगंध सुटेपर्यंत भाजा. मसाले करपणार नाहीत याची काळजी घ्या, कारण करपल्यास चव कडवट होऊ शकते. भाजलेले मसाले एका प्लेटमध्ये काढून पूर्णपणे थंड होऊ द्या.

मसाला वाटा

थंड झाल्यावर हे भाजलेले मसाले मिक्सरच्या भांड्यात घ्या. त्यात जायफळ (थोडे किसून), जायपत्री, लाल तिखट, हळद, सुंठ पावडर (असल्यास) आणि आमचूर पावडर (असल्यास) घाला.

कसा वाटाल?

हे सर्व घटक एकदम बारीक पावडर होईपर्यंत वाटून घ्या. मिक्सर जास्त वेळ चालवू नका, गरम झाल्यास मसाल्याचा सुगंध कमी होऊ शकतो.

हवाबंद डबा

तयार झालेला सुगंधी पुलाव मसाला एका हवाबंद डब्यात भरून ठेवा. हा मसाला तुम्ही साधारण ३-४ महिने सहज वापरू शकता.

Wakad Tourism: पुण्याजवळ फिरायचंय? मग एका दिवसात वाकडची ट्रिप नक्की प्लान करा

येथे क्लिक करा