Sakshi Sunil Jadhav
उच्च रक्तदाब कमी करण्यासाठी औषधांबरोबरच जीवनशैलीत काही आवश्यक बदल करणे खूप महत्त्वाचे असते.
दररोज जेवणात ५ ग्रॅम पेक्षा कमी मीठ वापरा. चिप्स, लोणचं खाणं टाळा.
केळी, पालक, बीट, आवळा, संत्री अशा फायबरयुक्त आहार घेतल्याने रक्तदाब नियंत्रणात राहतो.
दररोज किमान ३० मिनिटे चालणे, सायकलिंग, पोहणे किंवा योगा करा.
वजन वाढल्याने हृदयावर अधिक ताण येतो. वजन कमी केल्यानेच BP कमी होतो.
निकोटीन आणि अल्कोहोल रक्तवाहिन्यांवर दुष्परिणाम करतात. त्याने अचानक बीपी वाढण्याची शक्यता वाढते.
ध्यान, प्राणायाम, छंद जोपासा, पुरेशी झोप (7-8 तास) आणि मानसिक शांती घ्या.
जास्त चहा/कॉफी घेतल्यास BP वाढतो. दिवसातून १-२ कप पुरेसे आहेत.
सूप, सॉस, फास्टफूड यांपासून दूर राहा.
शरीरातील द्रवपदार्थाचं संतुलन राखलं गेलं तर रक्तदाबही स्थिर राहतो. दिवसातून किमान ७–८ ग्लास पाण्याचे सेवन करा.