International Day of Yoga 2025: वर्क फ्रॉम होम करताना फोकस वाढवायचाय? हा आहे बेस्ट योगा रूटीन

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

वर्क फ्रॉम होम

वर्क फ्रॉम होम करताना एकाच जागी जास्त वेळ बसून राहिल्याने शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर परिणाम होऊ शकतो.

योगा

यासाठी काही योगासने खूप फायदेशीर ठरतात. ही योगासनं कोणती ते आपण पाहूयात.

भुजंगासन

हे आसन पाठीच्या कण्यासाठी खूप चांगलं मानलं जातं. यामुळे पाठीचा कणा मजबूत होतो आणि पाठदुखी कमी होते.

गोमुखासन

हे आसन खांदे, मांड्या आणि हिप्समधील ताण कमी करण्यास मदत करते. यामुळे शरीरातील लवचिकता वाढते आणि रक्ताभिसरण सुधारतं.

पश्चिमोत्तनासन

हे आसन पाठीचा कणा आणि हॅमस्ट्रिंग्ज यांना ताण देण्यासाठी उपयुक्त आहे. यामुळे पोटाचे स्नायू एक्विव्ह होतात.

उत्कटासन

हे आसन मांड्या, पोटऱ्या आणि पाठीच्या खालच्या भागाला बळकटी देण्यास मदत करतं. वर्क फ्रॉम होम करताना पाय दुखत असल्यास हे आसन फायदेशीर ठरतं.

शवासन

दिवसभराच्या कामामुळे आलेला ताण कमी करण्यासाठी आणि मन शांत करण्यासाठी हे आसन खूप महत्त्वाचं आहे. हे आसन शारीरिक आणि मानसिक विश्रांतीसाठी उपयुक्त आहे.

Nerle waterfall: सांगलीजवळील 'या' धबधब्यावर भिजण्याची मजा वेगळीच; पाहा one day trip प्लान

येथे क्लिक करा