Dhanshri Shintre
प्रवास केल्याने केवळ शरीर तंदुरुस्त राहत नाही, तर मानसिक आरोग्यालाही सकारात्मक ऊर्जा आणि विश्रांती मिळते.
प्रवास करताना एंडोर्फिन हार्मोन स्रवतो, ज्यामुळे आनंदाची भावना वाढते आणि मन प्रसन्न होते. त्यामुळे प्रवास फायदेशीर ठरतो.
एंडोर्फिन हार्मोन तणाव कमी करून मानसिक शांती मिळवण्यास मदत करतो आणि मनाला सकारात्मक ऊर्जा प्रदान करतो.
अनोळख्या ठिकाणी फेरफटका मारल्याने मन प्रसन्न होते, नवीन अनुभव मिळतात आणि आनंदाची भावना आपोआप निर्माण होते.
प्रवास करताना चालणे, चढ-उतार करणे यामुळे शरीर सक्रिय राहतं आणि तो एक उत्तम प्रकारचा व्यायाम ठरतो.
हिरवळीवर चालणे आणि प्रवासातील हालचाली हृदयाचे आरोग्य सुधारतात आणि शरीर अधिक तंदुरुस्त ठेवण्यास मदत करतात.
प्रवासामुळे मानसिक विश्रांती मिळते, तणाव कमी होतो आणि त्यामुळे रात्रीची झोप अधिक गाढ व शांत होते.
प्रवास केल्याने मन प्रसन्न होते, थकवा दूर होतो आणि कामात नवचैतन्य व उत्साह निर्माण होतो.