Stress Free Living: सततच्या ताणातून बाहेर पडायचंय? अवलंबा 'हे' ९ आरोग्यदायी सवयी आणि उपाय

Dhanshri Shintre

स्ट्रेच करा

तासन्‌तास बसल्यानंतर काही मिनिटे हात, पाय आणि पाठ हलक्या ताणाने स्ट्रेच करा; यामुळे शरीर सैल होते आणि तणाव कमी होतो.

स्क्रीन टाइम

नकारात्मक बातम्यांचे सतत स्क्रोल करणे मनावर ताण आणते. स्क्रीन टाइम कमी करा आणि मेंदूला थोडा शांत व विश्रांतीचा वेळ द्या.

मित्रांसोबत वेळ घालवा

कुटुंब वा मित्रांसोबत गप्पा मारणे, हसणे किंवा एकत्र जेवण करणे मनाला शांतता देतं आणि तुमचा मूड लक्षणीयरीत्या सुधारतो.

संगीत ऐका

संगीत तणाव कमी करण्याचा प्रभावी मार्ग आहे. सौम्य वाद्य संगीत किंवा तुमची आवडती शांत प्लेलिस्ट मन शांत ठेवायला मदत करते.

सुगंधी मेणबत्ती वापरा

लॅव्हेंडर, चंदन, व्हॅनिला यांसारख्या सुगंधांची मेणबत्ती लावल्याने खोली शांत वाटते आणि झोप सुधारण्यास मदत होते. मानसिक तणावही कमी होतो.

ध्यान करा

४ सेकंद श्वास घेणे, धरून ठेवणे आणि सोडणे हा सोपा व्यायाम शरीराला शांततेचा संकेत देतो आणि हृदयाचे ठोके नियंत्रित करतो.

पदार्थ खा

ब्लूबेरी, लिंबूवर्गीय फळे, डार्क चॉकलेट, अंडी, सॅल्मन, दही हे पदार्थ नैसर्गिकरीत्या तणाव कमी करून मूड सुधारण्यास आणि आरोग्य वाढवण्यास मदत करतात.

हर्बल टी प्या

गरम कॅमोमाइल किंवा ग्रीन टी नैसर्गिकरित्या नसा शांत करते, आराम देते आणि लक्ष केंद्रित करायला मदत करणारे उपयुक्त पेय आहे.

NEXT: व्यायामासाठी वेळ नाही? मग दररोज पायऱ्या चढा आणि 'या' ५ जबरदस्त फायद्यांचा अनुभव घ्या

येथे क्लिक करा