High blood pressure: औषधांशिवाय BP नियंत्रणात आणायचाय? दररोज फक्त 'या' 3 सवयी लावा

Surabhi Jayashree Jagdish

ब्लड प्रेशर

आजकाल चुकीच्या जीवनशैलीमुळे आणि व्यस्त शेड्युलमुळे अनेकांना आरोग्याच्या समस्या भेडसावतात. यामध्ये हाय ब्लड प्रेशर ही समस्या प्रामुख्याने दिसून येते. ब्लड प्रेशर जास्त वाढलं तर हार्ट अटॅक येण्याचा धोका असतो.

Blood pressure control | saam tv

लक्षणं

रक्तदाब वाढल्याची लक्षण पटकन समजून येत नाहीत. त्यामुळे ब्लड प्रेशरची वेळेत तपासणी करणं गरजेचं आहे. याशिवाय तज्ज्ञांनी जीवनशैलीत काही छोटे बदल सांगितले आहेत, ज्यामुळे औषधांशिवाय तुम्ही रक्तदाब नियंत्रणात आणू शकता.

Blood pressure symptoms | saam tv

एक्टिव राहा

निरोगी राहण्यासाठी हालचाल महत्त्वाची आहे. त्यामुळे दररोज ३० मिनिटं चालणं किंवा सायकल चालवणं फायदेशीर ठरतं. एका जागी बसून राहण्याची सवय असेल तर ती बदला

Blood pressure lifestyle changes | saam tv

मीठाच्या प्रमाणाकडे लक्ष द्या

जास्त प्रमाणात मीठ खाल्ल्याने ब्लड प्रेशर वाढू लागतं. त्यामुळे तुमच्या आहारात मीठाचं प्रमाण नियंत्रणात ठेवा. त्याचप्रमाणे तळलेल्या पदार्थांपासून चार हात लांब राहा.

Low salt diet | saam tv

ताजी फळं-भाज्या खा

तुमच्या आहारात हिरव्या भाज्या, सिझनल फळं आणि पौष्टिक पदार्थांचा समावेश करा. यामुळे तुम्हाला एनर्जीसोबत हृदय निरोगी राहण्यासही मदत होते.

Heart health | saam tv

औषधं वेळेवर घ्या

बीपी नॉर्मल झाला की अनेकजण औषधं घेणं बंद करतात. मात्र असं करणं चुकीचं आहे. डॉक्टरांनी जितक्या काळासाठी औषधं दिली आहेत तेवढे दिवस ती घेतली पाहिजेत.

Healthy lifestyle | saam tv

या सवयींपासून दूर राहा

सिगारेट, तंबाखू तसंच दारू या सवयींमुळे तुम्हाला नुकसान होतं. त्यामुळे या सवयींपासून दूर राहिलेलं तुमच्यासाठी फायदेशीर आहे. त्याचप्रमाणे ताणतणावात देखील राहू नका.

Hypertension diet | saam tv

टीप

ही माहिती विविध सार्वजनिक स्रोतांवर आधारित असून केवळ सामान्य माहितीसाठी देण्यात आली आहे. या माहितीची स्वतंत्र वैद्यकीय पडताळणी आम्ही केलेली नाही. कोणतीही लक्षणे आढळल्यास स्वतः निष्कर्ष काढण्याऐवजी तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या.

CNG bike: CNG बाईकची रेंज किती? 2 किलो CNGमध्ये जाणून घ्या किती किमी धावते?

CNG fuel economy | saam tv
येथे क्लिक करा