ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
पांढरे शूज, कॅनव्हास असो किंवा स्पोर्ट्स, प्रत्येक ड्रेसशी सहज जुळतात.
पांढऱ्या रंगाचे शूज जवळपास सगळ्यांनाच आवडत असले तरी ते घालण्याचा काळे होतात म्हणून फार कमी लोक घालतात.
पांढऱ्या शूजसाठी हे घरगुती उपाय इतके स्वस्त आहेत की कोणीही ते वापरून पाहू शकेल.
डिशवॉशर लिक्विड आणि गरम पाण्याने धुवा - डिशवॉशिंग लिक्विड एक कप कोमट पाण्यात मिसळावे लागेल आणि ते चांगले मिक्स करावे लागेल. यानंतर शूज कापड किंवा टूथब्रशच्या मदतीने घासून स्वच्छ करा.
बेकिंग सोडा + व्हिनेगरसह पांढरे शूज स्वच्छ करा - एक चमचा कोमट पाण्यात एक चमचा पांढरा व्हिनेगर आणि तेवढाच बेकिंग सोडा मिसळून पेस्ट बनवा. नंतर, टूथब्रश वापरून, गोलाकार हालचालीत शूज घासून घ्या.
टूथपेस्ट - दातांप्रमाणेच टूथपेस्टही तुमच्या पांढऱ्या शूजना चमक देण्याचे काम करते .
अशा प्रकारे पांढरे शूज खराब होणार नाहीत - शूज ताबडतोब स्वच्छ करणे किंवा त्यावर डाग पडताच ओल्या कपड्याने पुसणे महत्त्वाचे आहे. जास्त वेळ ते ठेवल्याने डाग पडू शकतो.
याशिवाय वॉशिंग मशीनमध्ये धुण्याची चूक करू नका . असे केल्याने शूज लवकर खराब होतात.