Surabhi Jayashree Jagdish
हिवाळ्यात गाजर हे एखाद्या सुपरफूडपेक्षा कमी नाही. त्यात फायबरसह अनेक आवश्यक पोषक घटक असतात. हे शरीरातील रक्ताचं प्रमाण वाढवतं.
हिवाळ्यात गाजराचा आहारात दोन पद्धतीने वापर होतो. एक म्हणजे गाजराचा हलवा आणि दुसरे म्हणजे गाजराचा रस. गाजराच्या रसात इतर भाज्या मिसळल्यास त्याचे फायदे दुप्पट होतात.
त्वचा चमकदार आणि निरोगी ठेवण्यासाठी व्हिटॅमिन सी आवश्यक आहे. गाजराच्या रसात लिंबू आणि आवळा मिसळून कोलेजन वाढवता येते. व्हिटॅमिन सी हा अँटिऑक्सिडंट असून त्वचा ग्लो मदत करतो.
आवळा हा पोषक घटकांचा खजिना आहे आणि त्यात सर्वाधिक व्हिटॅमिन सी असते. तीन ते चार गाजरांचा रस बनवताना त्यात एक-दोन आवळे घालावेत. यामुळे तुमच्या फेसवर ग्लो येईल.
गाजर, आवळा, बीट आणि आलं यांचा रस रोज प्यायल्यास शरीरातील रक्ताची कमतरता दूर होते. कारण या सर्व घटकांमध्ये लोह योग्य प्रमाणात असते.
मात्र हा रस पिणाऱ्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवावी. आयुर्वेद तज्ज्ञ सांगतात की, हा रस प्यायल्याने गॅसची समस्या होऊ शकते. हा त्रास टाळण्यासाठी रसात काळं मीठ घालवं.
जर एखाद्याला सर्दी किंवा खोकला असेल तर त्याने गाजराचे सेवन करू नये. गाजर थंड असल्याने ते सायनसची समस्या वाढवू शकतं. त्यामुळे अशा वेळी गाजराचा रस पिणं टाळावं.