Walking Effect: रोज १० हजार स्टेप्स चालल्याने खरच गुडघ्यांना त्रास होतो का? जाणून घ्या डॉक्टर काय सांगतात?

Shruti Vilas Kadam

१० हजार स्टेप्स चालणे सर्वांसाठी हानिकारक नसते

सामान्यतः निरोगी व्यक्तीसाठी रोज १० हजार स्टेप्स चालणे सुरक्षित आणि फायदेशीर मानले जाते. यामुळे हृदय, फुफ्फुसे आणि स्नायूंचे आरोग्य सुधारण्यास मदत होते.

Walking | GOOGLE

योग्य पद्धतीने चालल्यास गुडघे मजबूत होतात

नियमित चालण्यामुळे पायांच्या स्नायूंना बळकट होतात. मजबूत स्नायू गुडघ्यांवरील ताण कमी करण्यास मदत करतात आणि सांध्यांना आधार देतात.

walking | Saam Tv

आधीपासून गुडघेदुखी असल्यास काळजी घ्या

ऑस्टिओआर्थरायटिस किंवा इतर सांध्यांच्या समस्या असलेल्या व्यक्तींनी अचानक १० हजार स्टेप्स चालण्यास सुरुवात करू नये. डॉक्टर किंवा फिजिओथेरपिस्टचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

Walking | SaamTv

चुकीचे शूज गुडघ्यांच्या वेदना वाढवू शकतात

चालण्यासाठी योग्य कुशनिंग आणि सपोर्ट असलेले शूज वापरणे महत्त्वाचे आहे. चुकीच्या शूजमुळे गुडघे, घोटे आणि कंबर दुखू शकते.

Walking | canva

चालण्याचा वेग

खूप वेगाने चालल्यास गुडघ्यांवर अतिरिक्त ताण येऊ शकतो. शक्य असल्यास गवत, ट्रॅक किंवा समतल रस्त्यावर चालावे.

Walking | canva

हळूहळू स्टेप्स वाढवणे फायदेशीर

सुरुवातीला कमी अंतर चालून नंतर हळूहळू स्टेप्स वाढवाव्यात. अचानक १० हजार स्टेप्स चालण्याचा प्रयत्न केल्यास स्नायू आणि सांध्यांवर ताण येऊ शकतो.

Walking

शरीराचे संकेत दुर्लक्षित करू नका

चालताना किंवा चालल्यानंतर सतत गुडघेदुखी, सूज किंवा अस्वस्थता जाणवत असल्यास विश्रांती घ्या आणि वैद्यकीय सल्ला घ्या. वेदना दुर्लक्षित करणे योग्य नाही.

Walking

Skin Care: चेहऱ्यावर खूर ओपन पोर्स झालेत? मग सॉफ्ट स्किनसाठी हा फेसपॅक नक्की लावा, आठवड्याभरात दिसेल फरक

Face Care | Saam Tv
येथे क्लिक करा