कोमल दामुद्रे
भारतात सिद्धीविनायकचे मंदिर हे पहिल्या क्रमांकावर आहे. या ठिकाणी दररोज लाखो भक्त दर्शनाकरता येतात. मुंबईतील हे प्रसिध्द मंदिरांपैकी एक आहे.
श्रीमंत दगडूशेठ हलवाई मंदिर हे मानाच्या गणेश मंदिरामध्ये येते. हे मंदिर पुण्यात स्थित असून येथे लाखो भाविकांची गर्दी आपल्याला पाहायला मिळते.
कनिपकम विनायक मंदिर हे आंध्रप्रदेशातील चित्तूर जिल्ह्यातील तिरूपती मंदिरापासून ७५ किमी पासून दूर आहे. हे मंदिर आपल्या प्राचीन ऐतिहासिक शिल्प आणि कलांमुळे प्रसिद्ध आहे.
मनकुला विनायक मंदिर हे भारतातील सर्वाधिक प्राचीन मंदिरापैकी हे एक मंदिर १६६६ साली बांधण्यात आले आहे.
दहाव्या शताब्दीमध्ये बांधलेलं हे मंदिर अतिशय प्राचीन असून मधुर महागणपती मंदिर केरळच्या मधुवाहिनी या नदीच्या किनाऱ्यावर स्थित आहे.
राजस्थान मधील रणथंबौर गणेश मंदिर हे हजारो वर्षे जुने आहे. तसेच ते रणथंबौरच्या किल्यावर सर्वात उंच ठिकाणी स्थित आहे.