Virender Sehwag Birthday: अंपायरला भारतात करून दिली शॉपिंग आणि पुढच्याच सामन्यात...! वीरूने ऐकवलेला भन्नाट किस्सा

Surabhi Jayashree Jagdish

वीरेंद्र सेहवाग

आज २० ऑक्टोबर असून टीम इंडियाचा माजी क्रिकेटपटू आणि स्फोटक ओपनर वीरेंद्र सेहवाग याचा वाढदिवस आहे. दिल्लीतील नजफगडमध्ये सेहवागचा जन्म झाला आहे.

विक्रम

देशासाठी १०४ टेस्ट, २५१ वनडे आणि १९ टी-२० सामने खेळलेत. ज्यामध्ये त्याने १७ हजारांहून अधिक धावा केल्या. सेहवागने त्याच्या कारकिर्दीत अनेक विक्रम केले

मोठे टप्पे

सेहवागने त्याच्या कारकिर्दीत अनेक मोठे टप्पे गाठले, परंतु आम्ही तुम्हाला सेहवागबद्दलची एक अशी गोष्ट सांगणार आहोत जी फार कमी लोकांना माहित आहेत.

मुलाखतीत केला खुलासा

वीरेंद्र सहवाग यांनी एका मुलाखतीत सांगितले की त्यांनी पाकिस्तानी अंपायर असद रऊफ यांना भारतात शॉपिंग करून दिली होती.

आऊट दिलं नाही

महत्त्वाचं म्हणजे यानंतर लगेच भारताचा सामना होता. सेहवागच्या सांगण्यानुसार, दुसऱ्या दिवशी रऊफ यांनी त्याला आऊट दिलं नाही.

९० रन्सवर खेळत होता सेहवाग

मोहाली टेस्टमध्ये सहवाग 90 धावांवर खेळत होते आणि चेंडू त्यांच्या बॅटला लागला होता, परंतु रऊफ यांनी त्यांना आऊट दिले नाही.

रऊफ यांनी दिला नकार

मात्र सहवाग याच्या या दाव्याला रऊफ यांनी एका मुलाखतीद्वारे पूर्णपणे नाकारले होते.

सर्वाधिक शिकलेला मुघल बादशाह कोण होता?

येथे क्लिक करा