Shreya Maskar
सध्या व्हिएतनाम हे ठिकाण फॉरेन ट्रिपच्या लिस्टमध्ये ट्रेंडिंगवर आहे. अनेकांना येथे जायचे असते. येथे प्रत्येक ठिकाण स्वर्गाहून सुंदर आहे.
व्हिएतनाममधील हो ची मिन्ह सिटी, ज्याला पूर्वी सायगॉन म्हणून ओळखले जायचे. व्हिएतनाममध्ये राहण्यासाठी हॉटेल्स आणि वसतिगृहे यांसारखे अनेक परवडणारे पर्याय उपलब्ध आहेत
व्हिएतनाम त्याच्या प्राचीन मंदिरांसाठी प्रसिद्ध आहे, ज्यात हनोईमधील ट्रान क्वोक पॅगोडा आणि दौ पॅगोडा यांसारख्या ऐतिहासिक स्थळांचा समावेश आहे.
येथील जगप्रसिद्ध हाँग बे हे ठिकाणे पर्यटकांना आकर्षित करते. जिथे तुम्हाला समृद्ध संस्कृती आणि सुंदर समुद्रकिनारे अनुभवायला मिळतात.
व्हिएतनाममध्ये आशियाई हत्ती आणि वाघ यांसारखे दुर्मिळ प्राणी आढळतात. हत्तींना पाहण्यासाठी कॅट टिएन आणि योक डॉन राष्ट्रीय उद्यानांसारख्या ठिकाणी जावे लागते.
व्हिएतनामची विमानाचे तिकीट आणि हॉटेल बुकिंग तुम्हाला कमी पैशात हवी असेल तर जाण्यापूर्वी 2-3 महिने आधीच बुकिंग करा. तुम्हाला स्वस्तात मस्त डील मिळेल.
व्हिएतनामला ऑफ-सीझनमध्ये फिरायला जाण्याचा प्लॅन करा. जेणेकरून निम्म्या किंमतीत फ्लाइट, हॉटेल्स मिळतील. तसेच तेथे फिरायला देखील मजा येईल. कोणत्याही देशात गेलात तर खाजगी टॅक्सीऐवजी स्थानिक वाहतुकीने प्रवास करा.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. वरील माहितीला विकिपीडियाचा संदर्भ आहे.