Sakshi Sunil Jadhav
पुडाच्या वड्या बनवायला अगदी साध्या आणि सोप्या असतात. पुढे आपण याबद्दल सविस्तर रेसिपी आणि साहित्य जाणून घेणार आहोत.
साहित्य कोथिंबीर बारिक चिरलेली ,लाल तिखट, मीठ, सुकं खोबरं, तीळ आणि शेंगदाणे भाजून बारिक केलेले, आमचूर, साखर, हिरवी मिरची-लसूण आणि जीऱ्याचा ठेचा, खसखस, काळा मसाला, खडा मसाला, धणे जीरे पावडर इ.
पीठ १ वाटी ३ वाटी बेसन, ओवा, जिरे पावडर, दीड चमचा तेल याचं मिक्स करुन कणिक मळा. थोडं थोडं पाणी घालून कणीक घट्टसर मळा.
१ चमचा तूप, अर्धीवाटी चिंचेचा कोळ, अर्धीवाटी गुळ, मसाला जीरे पावडर, चाट मसाला. एका पॅनमध्ये मिक्स करुन चटणी तयार करा.
आता कोथिंबीर एका मोठ्या भांड्यात टाकून घ्या. त्यात सगळं साहित्य मिक्स करुन हाताने कोथिंबीर मळून घ्या.
तयार बेसनाचं पीठ घेऊन तुम्ही पुऱ्या लाटून घ्या. त्यामध्ये भरपूर सारण भरा आणि फ्रॅंकीप्रमाणे पॅक करा.
शेवटी मध्यम आचेवर तेल तापवून या वड्या तळून घ्या. वड्या एकदम क्रिस्पी ठेवा.
गरमा गरम वडा तुम्ही चिंचेच्या चटणीसोबत नाश्त्यात सर्व्ह करु शकता.