Veg Puff Recipe: बेकरीसारखे खुसखुशीत व्हेज पफ बनवा घरच्या घरी; चहासोबत खाण्यासाठी वाचा सोपी रेसिपी

Shruti Vilas Kadam

व्हेज पफ बनवण्यासाठी साहित्य

व्हेज पफ बनवण्यासाठी मैद्याची पफ पेस्ट्री शीट, २ उकडलेले बटाटे, अर्धी वाटी मटार, बारीक चिरलेला कांदा, गाजर, हिरवी मिरची, आले-लसूण पेस्ट, हळद, तिखट, गरम मसाला, मीठ आणि तेल घ्या.

Paneer Puff Recipe | Saam Tv

सर्वप्रथम भाजी तयार करा

एका कढईत तेल गरम करा. त्यात मोहरी, जिरे, हिरवी मिरची आणि आले-लसूण पेस्ट घाला. त्यानंतर कांदा घालून चांगला परतून घ्या.

Khari Puff Recipe | yandex

भाज्यांचे सारण बनवा

आता त्यात बारीक चिरलेले गाजर, मटार आणि उकडलेले बटाटे घाला. त्यात हळद, तिखट, गरम मसाला आणि मीठ टाका. सर्व मिश्रण चांगले एकत्र करून काही मिनिटे शिजवा. तयार सारण थंड होण्यासाठी बाजूला ठेवा.

Veg Puff

पफ पेस्ट्री शीट तयार करा

बाजारातून आणलेली पफ पेस्ट्री शीट घ्या. ती थोडी मऊ होऊ द्या. त्यानंतर चाकूने चौकोनी किंवा आयताकृती आकारात कापून घ्या.

Veg Puff

पफमध्ये सारण भरा

आता कापलेल्या शीटच्या एका बाजूला तयार केलेले भाज्यांचे सारण ठेवा. शीटची दुसरी बाजू त्यावर दुमडून घ्या. कडा व्यवस्थित दाबून बंद करा, जेणेकरून सारण बाहेर येणार नाही.

Veg Puff

ओव्हनमध्ये बेक करून घ्या

तयार व्हेज पफ बेकिंग ट्रेमध्ये ठेवा. त्यावर थोडे दूध किंवा फेटलेले अंडे लावा. आधी गरम केलेल्या ओव्हनमध्ये २०० अंश सेल्सिअस तापमानावर साधारण २० ते २५ मिनिटे बेक करा. पफ सोनेरी आणि खुसखुशीत होईपर्यंत बेक करा.

panner Puff

गरमागरम व्हेज पफ सर्व्ह करा

तयार झालेले खुसखुशीत व्हेज पफ ओव्हनमधून बाहेर काढा. थोडे थंड झाल्यावर टोमॅटो सॉस किंवा हिरव्या चटणीसोबत सर्व्ह करा. संध्याकाळच्या चहासोबत हा उत्तम नाश्ता आहे.

panner Puff | Saam Tv

Mobile Phone While Sleeping: रात्री झोपताना मोबाईल उशीजवळ ठेवताय? मग जाणून घ्या त्याचे परिणाम!

Mobile Phone While Sleeping | Saam Tv
येथे क्लिक करा