Sakshi Sunil Jadhav
महिला ज्या दिवसाची आतूरतेने वाट पाहत होत्या तो दिवस आता काही तांसावर येऊन पोहोचलाय.
वैदिक पंचांगानुसार यंदा वटपौर्णिमा सोमवार, 29 जून 2026 रोजी साजरी केली जाणार आहे. विवाहित महिलांसाठी हा दिवस विशेष महत्त्वाचा मानला जातो.
पौर्णिमा तिथी 29 जून रोजी पहाटे 3:07 वाजता सुरू होईल. ही तिथी 30 जून रोजी पहाटे 5:27 वाजता समाप्त होणार आहे.
हा सण पतीच्या दीर्घायुष्य, उत्तम आरोग्य आणि सुखी वैवाहिक जीवनासाठी साजरा केला जातो. महिलांकडून या दिवशी व्रत आणि विशेष पूजा केली जाते.
वटपौर्णिमेमागे सावित्री आणि सत्यवान यांची पौराणिक कथा सांगितली जाते. सावित्रीने आपल्या दृढ निश्चयाने यमराजांकडून पतीचे प्राण परत मिळवले होते.
वडाचे झाड दीर्घायुष्य, स्थैर्य आणि अखंड जीवनाचे प्रतीक मानले जाते. त्यामुळे महिलांकडून वडाच्या झाडाची पूजा करून प्रदक्षिणा घातली जाते.
29 जून रोजी सकाळी 6.30 ते दुपारी 12.30 या वेळेत वटपूजेसाठी शुभ मुहूर्त आहे. या कालावधीत पूजा केल्यास विशेष पुण्य प्राप्त होते, अशी श्रद्धा आहे.
पारंपरिक मान्यतेनुसार दुपारी 12:30 ते 2:30 या दोन तासांच्या कालावधीत वडाची पूजा करणे टाळा. हा कालावधी पूजेसाठी अशुभ मानला जातो.
हळद, कुंकू, अक्षता, फुले, दिवा, विड्याची पाने, कलश आणि विविध फळे पूजेसाठी वापरली जातात. तर पांढरा सुती धागा आवश्यक असतो.
हा सण पती-पत्नीतील विश्वास, प्रेम, निष्ठा आणि परस्पर आदराचे महत्त्व अधोरेखित करतो. कुटुंबातील सुख, समृद्धी आणि एकोप्यासाठीही प्रार्थना केली जाते.