कपडे कोणत्या दिशेला वाळवण्यास घालावे? दिशा चुकली तर येईल आर्थिक तंगी

Bharat Jadhav

आर्थिक तंगी

वास्तुशास्त्रात 'जल' (पाणी) आणि 'सूर्य' (अग्नी/ऊर्जा) या दोन्ही तत्त्वांना कपडे धुणे आणि वाळवण्याशी जोडले गेले आहे. जर कपडे चुकीच्या दिशेला किंवा चुकीच्या वेळी वाळवले, तर घरात नकारात्मक ऊर्जा वाढते. पैशांची उधळपट्टी होऊन आर्थिक तंगीचा सामना करावा लागू शकतो.

कपडे वाळवण्यासाठी सर्वोत्तम दिशा पूर्व दिशा

कपडे वाळवण्यासाठी पूर्व दिशा सर्वात उत्तम मानली जाते. पूर्वेकडून मिळणारा सकाळचा कोवळा सूर्यप्रकाश कपड्यांमधील जंतू नष्ट करतोच, शिवाय घरात सकारात्मक ऊर्जा आणतो.

उत्तर-पूर्व (ईशान्य) किंवा उत्तर दिशा

उत्तर दिशा ही कुबेराची (धनाची) दिशा मानली जाते. या दिशेला ओले कपडे जास्त वेळ लटकवून ठेवल्यास किंवा घाणेरडे पाणी साचल्यास लक्ष्मीचा कोप होतो आणि पैशांचा अपव्यय सुरू होतो. यामुळे उत्तर किंवा ईशान्य कोपऱ्यात ओले कपडे वाळवणे टाळावेत.

पश्चिम दिशा

जर पूर्वेकडे जागा नसेल, तर तुम्ही पश्चिम दिशेला कपडे वाळवू शकता. येथे दुपारचे ऊन चांगले मिळते.

रात्रीच्या वेळी बाहेर कपडे वाळवणे असतं अशुभ

अनेकदा लोक रात्रीच कपडे धुऊन गॅलरीत किंवा छतावर वाळत घालतात. वास्तुशास्त्र आणि विज्ञान या दोन्हीनुसार हे चुकीचे आहे. रात्रीच्या वेळी वातावरणात नकारात्मक ऊर्जा जास्त असते, जी ओल्या कपड्यांमध्ये लवकर शोषली जाते.

मुख्य दरवाजा समोर कपडे वाळवणे

घराच्या मुख्य दरवाजासमोर किंवा प्रवेशद्वारावर कधीही कपडे वाळत घालू नये. यामुळे मुख्य दारातून घरात येणारी सकारात्मक ऊर्जा अडवते आणि घरात दारिद्र्य येते.

घराच्या आत किंवा बेडरूममध्ये कपडे वाळवले तर...

ओले कपडे घरात किंवा झोपण्याच्या खोलीत (बेडरूम) वाळवल्याने घरातील दमटपणा वाढतो. वास्तुशास्त्रानुसार यामुळे दांपत्य जीवनात भांडण, वाद होत असतात. घरातील सदस्यांच्या आरोग्यावर वाईट परिणाम होतो.

टीप

या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीचीपूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत साम टीव्ही कोणताही दुजोरा देत नाही.

हेही वाचा

येथे क्लिक करा

दुसऱ्यांच्या घरी पितरांचे जेवण करणं शुभ की अशुभ? श्राद्ध भोजनाने दोष लागतो का?