Sakshi Sunil Jadhav
वास्तुशास्त्राप्रमाणे घरात योग्य दिशेला आणि योग्य पद्धतीनं काही शुभ रोपं लावल्याने पैसा, सुख-समृद्धी, सकारात्मक ऊर्जा आणि सौभाग्य प्राप्त होतं. ही रोपं महिलांनी लावणं खूप भाग्यशाली ठरू शकतं.
घराच्या मुख्य दरवाजाच्या डाव्या बाजूला लाजाळूचे झाड लावणे खूप शुभ मानलं जातं. याने लक्ष्मीची कृपा राहते आणि घरात सकारात्मक ऊर्जा वाढते.
हिंदू धर्मात तुळस पवित्र मानली जाते. तुळशीचे रोप घरात ठेवल्याने विष्णू देवाची कृपा मिळते. त्यामुळे धनाची कमतरता भासत नाही आणि आरोग्यही चांगलं राहतं.
वास्तुशास्त्रानुसार मनी प्लांट हे सुख-समृद्धीचे प्रतीक आहे. हे रोप आग्नेय किंवा दक्षिण-पूर्व दिशेला लावल्यास घराची आर्थिक स्थिती मजबूत होते.
श्वेतार्क किंवा रुईच्या झाड हे गणपतीचे प्रतिक मानतात. घराच्या मुख्य दारासमोर हे रोप लावल्याने नकारात्मक ऊर्जा कमी होते आणि घरात सुख-समृद्धी नांदते.
मोहिनीचे रोप घरात लावल्यास सुख, शांती आणि सकारात्मक वातावरण निर्माण होते. घरात भांडणं होत असतील तर हे रोप लावणं लाभदायक ठरतं.
वास्तुशास्त्रानुसार अशोकाचे झाड वास्तुदोष दूर करतं. ज्या घरासमोर अशोकाचे झाड असतं, तिथे नकारात्मक ऊर्जा टिकत नाही. रोज पाणी घातल्यास पैशाच्या अडचणी दूर होतात.
अश्वगंधा हे एक आयुर्वेदिक औषधी झाड आहे. ज्योतिषशास्त्रानुसार हे रोप घरात ठेवल्यास नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि आर्थिक स्थिती मजबूत होते.
कोणतेही रोप वास्तुतील योग्य दिशेला लावणे आवश्यक आहे. चुकीच्या दिशेला रोप लावल्यास त्याचा विपरीत परिणाम होऊ शकतो.