Ruchika Jadhav
वास्तू शास्त्रात घरात कोणत्या गोष्टी घडणे शुभ मानले जाते याची माहिती आज जाणून घेणार आहोत.
काळी मुंगी देवाची असते असं म्हटलं जातं. त्यामुळे तुमच्या घरात जास्त काळ्या मुंग्या झाल्या असतील तर त्यांना मारू नका.
काळ्या मुंग्या घरात सतत एकाच जागी जमा होत असतील तर त्यांना साखर द्या. तसेच तुम्हाला त्या जागी मुंग्या नको असतील तर घराबाहेर थोडी साखर टाका. याने घरात आनंद येतो.
काही व्याक्तींच्या घरावर पक्षी घरटे करतात. पक्षांनी घरटे केल्यास आपल्या घरात धन संपत्तीचा वर्षाव होतो.
सकाळी झोपेतून उठल्यावर काही दिवसांपासून तुमच्या कानावर सतत शंख नाद ऐकू येत असेल तर हे फार शुभ मानले जाते.
झोपेत मंत्र किंवा शंख नाद ऐकू येणाऱ्या व्यक्तीच्या आयुष्यात महत्वाची आनंदची बातमी येणार असते.
अशा गोष्टी तुमच्याही आयुष्यात घडत असतील तर तुमची आर्थिक समस्या लवकरच दूर होणार आहे.