Ruchika Jadhav
दरवाजावर लिंबू- मिरची लावल्याने नकारात्मक उर्जा दूर होते असा काहींचा समज आहे.
आपल्या मार्गातील अडथळे दूर करण्यासाठी देखील काही व्यक्ती याचा वापर करतात.
हिरवी मिरची लाल झाली म्हणजे तिने नकारात्मक उर्जा आपल्याकडे खेचली.
आता या सर्व तर अंधश्रद्धा आहेत. मात्र याचे वैज्ञानीक कारण देखील आहे.
काम करताना आपले लक्ष कायम आपल्या कामावर असावे.
गरज नसताना एका ठिकाणी जास्त थांबू नये यासाठी लिंबू मिरची बांधली जाते.
लिंबू मिरचीवर आपली नजर पडताच मनात त्याच्या चवीचा विचार येतो.
त्यामुळे व्यक्ती तेथून निघून जातात आणि आपल्या कामाशी काम ठेवतात.