Manasvi Choudhary
हिंदू धर्मामध्ये पूजाअर्चेला विशेष महत्व आहे.
देवघर हे घरातील पवित्र स्थान मानलं जाते.
यामुळे देवघरातील काही वस्तू असतात ज्या सकारात्मक वातावरण निर्माण करतात.
वास्तूशास्त्रानुसार काही गोष्टी देव्हाऱ्यात ठेवल्याने सुख-समृद्धी आणि धनवृद्धी येते. तसंच लक्ष्मीचा आशीर्वादही कायम राहतो.
घरात दररोज घंटा वाजल्याने सकारात्मकता राहते म्हणून पूजेत घंटी वाजवली जाते.
मोरपंखामुळे संपत्तीत वाढ होते, घरात सुखशांती नांदते.
देवघरात शंख ठेवणंही शुभ मानलं जाते. पूजेनंतर शंखनाद केल्याने घरात सुख-समृद्धी राहते.
गंगाजल पितळ किंवा चांदीच्या पात्रात भरून ठेवलं जाते त्यामुळे लक्ष्मी प्रसन्न होते.